राहुरी :- तालुक्यातील एका गावातील ६ वर्ष वयाच्या लहान मुलीवर १५ ते १६ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली असून मुलीच्या आईने हा प्रकार पाहिला.
त्यानंतर शेजारीच राहणारा हा आरोपी मुलगा पळून गेला. याप्रकरणी आज पिडीत मुलीचे नातेवाईक लहान मुलीला घेवून पोलिसांकडून आले होते. राहुरी पोलिसांनीही घटनेची गांभिर्य लक्षात घेवून आरोपी शोधण्यासाठी पोलीस पथक रवाना केले.

दुपारी उशिरापर्यंत याप्रकरणी चौकशी व तपास सुरु होता. दरम्यान शेजारच्या मुलाकडून अशाप्रकारे ६ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
- Small Business Ideas : केटरिंग बिझनेस कसा सुरू करायचा ? कमी गुंतवणुकीत मोठा नफा मिळवण्याची संधी!
- Axis Bank Personal Loan : अॅक्सिस बँक देतेय 40 लाखांपर्यंत लोन ! असा करा अर्ज…
- Jio चा धमाका! 198 रुपयांत 2GB/Day डेटा आणि अमर्यादित कॉलिंग!
- Stocks To Buy : शेअर बाजारात सध्या कोणते शेअर्स विकत घ्यावे? टॉप ब्रोकरेज फर्मने दिली मोठी यादी !
- २,१०० रुपयांचा निर्णय प्रस्तावानंतर