जामखेड : कर्जत विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस्च्या उमेदवाराचे डिपाजीट जप्त करण्याची जबाबदारी विखे पाटील यांची आहे. तसेच जिल्ह्यासह मतदारसंघाच्या विकासासाठी तालुक्यातील सुपुत्राची गरज आहे, बाहेरच्यांची नाही. असा टोला खा.डॉ.सुजय विखे रोहित पवार यांचे नाव न घेता लावला.
जप्त करण्याची जबाबदारी आपली जामखेड येथे आयोजित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खा. विखे म्हणाले की, ज्या पवार कुटुंबीयांनी आम्हाला गेल्या ३० वर्षे त्रास दिला. आता आम्ही त्यांच्या उमेदवाराचे डिपाझीट जप्त करण्याची जबाबदारी घेतली आहे.
जिल्ह्यासह कर्जत, जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना कुकडीचे हक्काचे पाणी देण्यात येणार नाही. असे तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी पञ दिले होते. ते पञ आजही आमच्याजवळ आहे. परंतु पालकमंत्री ना. प्रा राम शिंदे यांनी विशेष प्रयत्न करुन कुकडीच्या हक्काच्या पाण्यासाठी विधानसभेत कायमस्वरूपी मंजूर घेऊन त्या साठी ४०० कोटींचा निधी मंजूर केला आहे.
विखे कुटुंब अनेक पिढ्यांपासून सर्वसामान्यांच्या हितासाठी समाजसेवा करत आहे.मात्र आम्ही कधीही फोटो काढून ते फेसबुकवर टाकले नाहीत.
यावेळी उपजिल्हाध्यक्ष सुर्यकांत मोरे, तालुकाध्यक्ष रवि सुरवसे, शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात, संचालक सुधीर राळेभात, सभापती सुभाष आव्हाड, पं.स.सदस्य भगवान मुरूमकर, किसनराव ढवळे, सभापती गौतम उतेकर,
सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय काशिद, सभापती अमित चिंतामणी, पणन संचालक डॉ ज्ञानेश्वर झेंडे, सरपंच संजय गोपाळघरे, हरीभाऊ मुरुमकर, भारत काकडे, भारत उगले,गणेश लटके,केशव वनवे, डॉ.गणेश जगताप, कृष्णाराजे चव्हाण, अमजद पठाण, विलास मोरे,
डॉ.बाळासाहेब बोराटे, सतिश ढगे, बलभिम परखड, वैजीनाथ दराडे, प्रा.अरूण वराट, मुंतजर सय्यद, भारत काकडे, सोमनाथ पाचरणे, अनिल लोखंडे, कविता जगदाळे, बिभिषण धनवडे, संदीप गायकवाड, गणेश आजबे, राजेश वाव्हळ,
मोहन पवार,बाजीराव गोपाळघरे, मनोज राजगुरू, पृथ्वीराज वाळुंजकर, महादेव डूचे, ॲड.बंकटराव बारवकर, सूभाष जायभाय, सर्व सरपंच उपसरपंच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
- केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोग स्थापनेला मंजुरी ; पगारात काय फरक पडेल ?
- 8th Pay Commission Breaking : एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ; 2026 पासून होणार लागू
- 8th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्राची मंजुरी
- माणसाचे गीत गाणारे – डॉ. सुधीर तांबे
- लोकसर्जन – मा.आ.डॉ सुधीर तांबे.