संगमनेर- फोन करून मजुरीच्या पैशाची मागणी केल्याने राग येऊन ठेकेदाराने दुचाकीवर बसवून पळवून नेऊन लाकडी दांड्याने व लोखंडी गजाने बेदम मारहाण जखमी केले. ही घटना संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे घडली.
सविस्तर माहिती अशी की, सुरेश जगन्नाथ शेळके हे आरोपी प्रदीप आनंदा दशिंग, रा. लोहारे, ता. संगमनेर याच्याकडे गवंडी म्हणून कामास होते. शेळके यांचे मजुरीचे पैसे दुशिंगकडे राहिले होते. शेळके यांनी वेळोवेळी फोन करून मजुरीच्या पैशाची मागणी करत होते.
पण विनंती केल्याचा राग येवून ठेकेदार आरोपी प्रदीप दुशिंग व त्याच्याबरोबरील चौघा साथीदारांनी सुरेश शेळके हे सौभाग्य मंगल कार्यालयाच्या मागे लघुशंकेसाठी गेले.
तिकडे गेले असता दुचाकीवर बसवून पळवून नेवून लाकडी दांड्याने व लोखंडी गजाने बेदम मारहाण करुन हात व पाय फ्रेंक्चर केला, कपाळावर जखम केली.
दोन दुचाकीवर आरोपी होते. जखमी सुरेश शेळके यांच्या फिर्यादीवरुन आरोपी प्रदीप दुशिंग व इतर चौघे यांच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.