संगमनेरच्या तरुणीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून नायजेरियन तरुणाकडून फसवणूक

Ahmednagarlive24
Published:

तरुणीशी ऑनलाइन मैत्री करून तिला गिफ्ट पाठवत असल्याचे सांगून तिची फसवणूक केल्याप्रकरणी नगर पोलिसांनी नायजेरियन आरोपीस अटक केली आहे. 

हा नायजेरियन तीन वर्षांपूर्वी भारतात मेडिकल व्हिसावर आला होता. त्यानंतर त्याने व्हिसाचे नूतनीकरण केले नाही. तो परत त्याच्या देशात गेला नाही. गेल्या अडीच वर्षांपासून तो दिल्लीमध्ये बेकायदा राहत होता.

जिल्ह्यातील संगमनेर येथील उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणीला प्रेमाचा जाळ्यात ओढून तिला गिफ्ट पाठविल्याचे सांगून तिची ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा सायबर पोलिस स्टेशनने गेल्या आठवड्यात उघडकीस आणला आहे.

नायजेरियन देशाचा नागरिक इगुन फ्रँक व भारतीय तरुणी मोनिका गॉडवीन या दोघांना अटक करण्यात आली.

इतर नायजेरियन व्यक्तींच्या मदतीने नायजेरियन फ्रॉड करण्यास सुरुवात केली. फेसबुक, इन्स्टाग्रामचा वापर करून मुलींशी संपर्क करून त्यांच्याशी संवाद साधून मैत्री केली जात होती.

त्यानंतर व्हीआयपी फोन नंबर मिळवून तरुणींशी व्हॉट्सअॅपवरून चॅटिंग केली जात होती. त्यानंतर गिफ्ट पाठविल्याचे सांगून कस्टम ड्युटीमध्ये गिफ्ट अडकल्याचे सांगून बँक खात्यावर आनलाइन पैसे ट्रान्सफर करून फसवणूक केली.

आतापर्यंत तीस तरुणींशी या पद्धतीने मैत्री केली. त्यातील काही तरुणींची आर्थिक फसवणूक केल्याचे आरोपीने तपासात कबूल केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment