संगमनेर :- नगर लोकसभा मतदारसंघात मला व्यक्तिद्वेषातून विरोध करण्यात आला. थोरातांनी मला का विरोध केला याचे उत्तर मागण्यासाठी मी संगमनेरमध्ये आलो आहे.
ज्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने बघितली अशी दोन्ही माणसे माझ्या पराभवासाठी नगरमध्ये तळ ठोकून बसली.

या सर्वांनी प्रयत्न केले, तरी निकाल काय लागेल हे सांगायची गरज नाही, अशा शब्दांत डॉ. सुजय विखे यांनी बाळासाहेब थोरात आणि शरद पवार यांच्यावर शरसंधान साधले.
साकूर येथे महायुतीचे उमेदवार सदाशिव लाेखंडे यांच्या प्रचारासाठी विखे यांनी सभा घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना टीकेचे लक्ष्य केले.
ते म्हणाले, आमच्या घरात वाद लावण्याचे प्रयत्न तुम्ही केले. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा. पदाच्या महत्त्वाकांक्षेपोटी उद्या तुमच्याही कुटुंबात कलह निर्माण झाला, तर आश्चर्य वाटू देऊ नका.
आमच्या सहकारी संस्थांवर कायम टीका केली जाते, परंतु बंद पडलेले सहकारी साखर आम्ही चालू केले, तेथील कामगार आणि शेतकऱ्यांना आधार दिला.
सहकार चळवळ टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला, यात तुम्हाला वाईट वाटण्याचे काय कारण?
राज्यात आघाडी सरकार असताना कवडीमोल भावाने सहकारी साखर कारखानदारी विक्रीला काढण्याचे धोरण राधाकृष्ण विखे यांनी हाणून पाडले.
त्यामुळेच आज साखर कारखाने टिकून राहिले. आमच्या संस्थांबद्दल बोलताना थोरातांनी त्यांच्या सहकारी संस्थांमध्ये किती सामान्य कार्यकर्त्यांना पदे दिलीत याचा जाब विचारण्याची तयारी जनतेने ठेवावी.
संगमनेर तालुक्याच्या विकासासंदर्भात मी २३ मेनंतर गावोगावी जाऊन लोकांना माहिती देईन. माहिती देईन असे विखे म्हणाले.
- Mahindra Scorpio खरेदीसाठी 400000 रुपये डाऊन पेमेंट केल्यानंतर किती EMI भरावा लागणार ? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन
- Motorola लवकरच मोठा धमाका करणार! लाँच होणार ‘हा’ नवीन स्मार्टफोन
- ओला, बजाजच्या स्कूटरला टक्कर देण्यासाठी लॉन्च झालेली नवीन इलेक्ट्रिक Scooter ! कसे आहेत फिचर्स?
- तुमच्या आईच्या किंवा वडिलांच्या नावे पोस्टाच्या ‘या’ योजनेत 100000 रुपयांची गुंतवणूक करा, 24 महिन्यांनी मिळणार जबरदस्त रिटर्न
- तारीख ठरली ! ‘या’ मुहूर्तावर लॉन्च होणार वनप्लस 15, किंमत किती राहणार ?