उद्या आ. संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार ?

Ahmednagarlive24
Published:

२१ ऑक्टोबरला होत असलेल्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहराचे आ. संग्राम जगताप आणि शिवसेनेचे उपनेते माजी आ. अनिल राठोड यांच्याविषयी आता नव्याने वावड्या उठायला लागल्या आहेत.

अर्थात या वावड्या आहेत म्हणून की काय, या दोघांकडूनही यासंदर्भात अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र येत्या दि. २४ रोजी आ. संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार असून माजी आ. अनिल राठोड यांना विधान परिषदेचा ‘शब्द’ देण्यात आल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. आ. जगताप यांच्या पक्षांतराविषयी गेल्या अनेक महिन्यांपासून वावड्या उठत आहेत.

या चर्चा ऐकून आ. जगतापांनीही स्वत:च्या कपाळावर हात मारुन घेतला आहे. मात्र असल्या वावड्यांना ‘नो चँलेंज’ अशी परिस्थिती असल्याने त्यांचाही नाविलाज झालाय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment