शिर्डी-: विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजण्याची चिन्हे दिसू लागल्याने पक्षांकडून मतदार संघनिहाय उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. शिवसेनेच्या वतीने नगर जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती मुंबईत सेना भवनावर पार पडल्या.
यावेळी शिर्डी मतदार संघातून विधानसभेसाठी शिवसेना नेते कमलाकर कोते, राहात्याचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, उपजिल्हा प्रमुख अनिल बांगरे, जिल्हा संघटक विजय काळे यांनी मुलाखती दिल्या आहेत.
राज्यात शिवसेना व भाजप यांच्यात जागावाटपाबाबत अद्याप बोलणी सुरू आहे. जागावाटपाचा तिढा कायम असतानाच दोन्ही पक्ष स्वबळाची तयारी दर्शवू लागले आहे. तशा बैठका वरिष्ठ पातळीवर घेतल्या जात आहेत.
कोणत्या मतदारसंघात कोणास उमेदवारी द्यायची याची चाचपणी केली जात आहे. नुकत्याच शिवसेना भवनावर शिवसेनेच्या विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती माजीमंत्री दीपक सावंत, शिवसेना उपनेते माजी आ. अरविंद नेरकर यांनी घेतल्या.
शिर्डी मतदारसंघातून शिवसेना नेते कमलाकर कोते, राहात्याचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, उपजिल्हा प्रमुख अनिल बांगरे, जिल्हा संघटक विजय काळे यांनी मुलाखती दिल्या. शिर्डी मतदार संघ हा ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला आहे.
गेल्या पंचवीस वर्षापासून या मतदार संघात ते विजय संपादन करीत आहेत. यावेळी ते भाजपात दाखल झाले असले तरी त्यांच्याविरोधात आता कोण उभे राहणार याचीच चर्चा सध्या सुरू आहे.
- पोस्टाच्या आरडी योजनेत 100,500,1000 आणि 2 हजार रुपयांची गुंतवणूक किती दिईल परतावा? जाणून घ्या कॅल्क्युलेशन
- आरोग्य विभागाच्या संपूर्ण कामकाजाच्या चौकशीचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे आदेश !
- Vinod Kambli Wife : विनोद कांबळीची पत्नी काय काम करते ? वाचून बसेल धक्का
- Property Card : अहिल्यानगर जिल्ह्यातील ८ हजार मालमत्ता पत्रक ! ड्रोनच्या सहाय्याने सर्व्हेचे कामकाज पूर्ण
- पैसे दिले नाही म्हणून सासरच्या लोकांकडून मारहाण ! पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल