श्रीगोंदे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मोठा राजकीय भूकंप झाला. राजेंद्र नागवडे भाजपवासी झाल्यानंतर त्याचा परिणाम शहराच्या राजकारणात झाला. काँग्रेस आघाडीच्या सात नगरसेवकांनी व नगराध्यक्ष शुभांगी पोटे यांनी काँग्रेसला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला.
बबनराव पाचपुते यांच्या माऊली निवासस्थानी सर्व नगरसेवकांचे बबनराव पाचपुते, प्रा. तुकाराम दरेकर, सदाशिव पाचपुते यांनी स्वागत केले. सदाशिव पाचपुते म्हणाले, मागे काय झाले हे न पाहता शहरासाठी विकासात्मक दृष्टिकोन सर्वांनी ठेवावा.
श्रीगोंदे नगरपालिका राज्यात आदर्श नगरपालिका करण्यासाठी सर्वांनी काम करावे. माजी नगराध्यक्ष व काँग्रेस आघाडी चे गटनेते नोहर पोटे म्हणाले, मध्यंतरी काही कारणामुळे बबनराव पाचपुते यांना सोडून जावे लागले.
मला मतदानाचा अधिकार आल्यापासून आजतागायत मी बबनराव पाचपुते यांचेच काम केले. मी त्यांचा कार्यकर्ता असून बबनदादांवर आपले पहिल्यापासूनच प्रेम आहे. शहराचा विकास डोळ्यासमोर ठेऊन पुन्हा भाजपमध्ये येण्याचा निर्णय आपण घेतला.
बबन दादांना सोडून जाण्याची मनापासून इच्छा नव्हती. मागील पाच वर्षांत पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली शहराचा विकास झाला. यावेळी बापूसाहेब गोरे, उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, भाजप तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक, पोपटराव खेतमाळीस, दत्तात्रेय हिरणावळे, दीपक शिंदे यांसह भाजप नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Ahilyanagar Breaking : महिंद्रा बोलेरो विहिरीत पडली ! चार जणांचा जागीच मृत्यू
- तुमच्या पत्नीच्या नावे ‘या’ योजनेत खाते उघडा आणि 1 कोटी 12 लाखांचा परतावा मिळवा! जाणून घ्या कॅल्क्युलेशन
- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या कारखान्याने दिला किती दर ? शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
- एचडीएफसीच्या ‘या’ योजनेने गुंतवणूकदारांना केले कोट्याधीश! महिन्याला 2 हजाराची गुंतवणूक करून मिळाले 4 कोटी
- तुमच्याकडेही आहे का एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा शेअर? तज्ञांकडून देण्यात आले SELL रेटिंग! कारण की…..