भरधाव पिकअपच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

Published on -

श्रीगोंदा  –  दौंड रस्त्यावर काष्टी परिसरात शिवनेरी चौकात भरधाव पिकअपच्या धडकेत पादचार्याचा जागीच मृत्यू झाला. पोपट विलास माने, वय ३८, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा असे पद्चार्याचे नाव आहे. 

भरधाव वेगातील पिकअप गाडी नं. एमएच १५ एफव्ही ३६९५ हिच्यावरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगात गाडी चालवून पायी चाललेले पोपट माने यांना धडक देत उडविले. धडक इतकी जोराची होती की, पोपट माने यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात करुन गाडीचालक गाडीसह फरार झाला, या अपघातप्रकरणी मयताचे नातेवाईक अक्षय कैलास माने यांनी श्रीगोंदा पोलिसांत फिर्याद दिल्ल्यावरून पिकअप गाडी ३६९५ हिच्यावरील फरार चालक आरोपीविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe