श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील म्हातारपिंपरी परिसरात दुचाकी रस्त्यावर स्लीप – घसरुन गाडी वरील विद्यार्थिनी निर्मला दुराजी कांबळे, वय १४, रा. म्हातारपिंपरी, ता. श्रीगोंदा ही तरुणी गाडीवरुन पडून डोक्याला मार लागून जबर जखमी झाली.
तिला गंभीर स्थितीत पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना डोक्याला मार लागलेली निर्मला कांबळे ही मुलगी मयत झाली.
काल बंडगार्डन पोलीस स्टेशन येथून बेलवंडी पोलिसांत तशी खबर आल्यावरुन पोलिसांनी अमृनं. ६९ नोंदविला असून स.फौ. भोसले हे पुढील तपास करीत आहेत.