श्रीगोंदे :- तालुक्यातील अजनुज, आर्वी, पेडगाव परिसरात यांत्रिक बोटींच्या साहाय्याने वाळूउपसा होत असल्याचे दिसताच येथील तहसीलदार महेंद्र माळी यांच्या पथकाने एकूण ८ बोटी जिलेटीनने उडवून सुमारे ४० लाखांचा मुद्देमाल बुधवारी नष्ट केला.
अजनुज, आर्वी व पेडगाव या नदीकाठच्या गावांत नदीपात्रातून विनापरवाना राजरोस वाळूउपसा होत असल्याचे माहिती तहसीलदार माळी यांना समजताच महसूलचे पथक पोलिस कर्मचाऱ्यांसह नदीपात्रात गेले. आठ बोटींच्या साह्याने वाळूउपसा सुरू असल्याचे त्यांना दिसले.

महसूलचे पथक दिसताच वाळूउपसा करणारे पळून गेले. या पथकाने तस्करांच्या ८ बोटी जिलेटीनच्या साहाय्याने उडवून दिल्या. सुमारे ४० लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
कारवाईसाठी गेलेल्या पथकात पेडगावचे मंडल अधिकारी अजबे, प्रशांत सोनवणे, सतीश घोडेकर, दादा टाके, उत्तम राऊत, प्रताप देवकाते, किरण बोराडे यांचा समावेश होता.
- भारतात एक रेल्वे तयार करण्यासाठी किती पैसे लागतात ? Indian Railway
- 1 मार्चला बँक चालू की बंद ? RBI च्या नियमांनुसार मार्च 2025 मधील बँक हॉलिडे यादी जाहीर!
- महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी मार्चमध्ये होळीपासून ईदपर्यंत शाळांना सलग सुट्ट्या School Holiday
- नगर जिल्ह्यासाठी नव्या बसेस द्या ! खा.नीलेश लंके यांचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना साकडे
- पिंपरी-चिंचवडमध्ये घर घेण्याआधी ही बातमी वाचा ! नाहीतर घराचं स्वप्न राहील अपूर्ण…