श्रीगोंदे :- तालुक्यातील निमगाव खलू येथे मुलानेच पित्याचा खून केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. दिलीप ऊर्फ दिल्या त्रिंबक भोसले असे मृताचे नाव आहे.
त्याचा मुलगा गोगल्या याला पोलिसांनी अटक केली आहे. दिलीपचा मुलगा गोगल्या ऊर्फ बुट्या भोसले हा थोडा वेडसर असून त्याच्यावर दौंड पोलिस ठाण्यात ड्रॉपचा गुन्हा दाखल आहे.

त्याने या अगोदरही आई-वडिलांना मारहाण केली होती. रविवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास वडील झोपेत असताना गोगल्याने त्यांच्या डोक्यात जबर घाव घातल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सकाळी उठल्यावर मुलगी, जम्बी पवार हिला वडिलांचा मृत्यू झाल्याचे दिसले. गोगल्या घरातून पळून गेला होता.
जम्बीच्या फिर्यादीवरून गोगल्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी काही तासांतच त्याला अटक केली.
- तारीख ठरली ! ‘या’ मुहूर्तावर लॉन्च होणार वनप्लस 15, किंमत किती राहणार ?
- प्रतीक्षा संपली ! ‘या’ तारखेला लॉन्च होणार विवोचा 200 MP कॅमेरावाला स्मार्टफोन, कॅमेरासारखी क्वालिटी मिळणार
- शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी ! 1 शेअरवर मिळणार 5 बोनस शेअर, ‘या’ कंपनीची मोठी घोषणा
- सरकारी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा पगार बोनस म्हणून दिला जाणार ! कोणाला मिळणार लाभ ? वाचा…
- 8 दिवसांनी शेअर मार्केटमध्ये तेजी ! ‘या’ 5 शेअर्सच्या किंमतीत 20 टक्क्यांची वाढ