श्रीरामपूरमध्ये दोघांना लाच घेताना पकडले !

Ahmednagarlive24
Published:
श्रीरामपूर: पत्नीच्या नावाने काढलेला जीएसटी क्रमांक दंड न भरता बंद करण्याठी चार हजारांची लाच घेताना नगरच्या जीएसटी अधिकाऱ्यासह खासगी कर सल्लागार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.
येथील हरिकमल प्लाझा येथे ही कारवाई करण्यात आली.  तक्रारदार हे श्रीरामपूरमधील असून पत्नीच्या नावे व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांनी जीएसटी नंबर डिसेंबर २०१८ मध्ये काढला होता.
काही कारणामुळे ते व्यवसाय सुरू करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी नंबर बंद करण्यासाठी खासगी कर सल्लागार नीलेश सुरेश हरदास (बेलापूर खुर्द) यांच्यामार्फत ऑनलाईन अर्ज केला.
दंड न भरता खाते बंद करण्यासाठी हरदास यांनी जीएसटी अधिकारी सुनील भास्कर टकले (वय ३५) यांच्यासाठी म्हणून तडजोडीअंती साडेतीन हजार रूपये लाच व स्वत:साठी पाचशे रूपये कमिशन अशा एकूण चार हजारांची मागणी केली.
लाचेची रक्कम हरीकमल प्लाझामधील हरदास यांच्या कार्यालयात स्वीकारताना पथकाने त्यांना पकडले. हरदास व टकले दोघांविरूद्ध कारवाई करण्यात आली.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment