श्रीरामपूर : दुचाकीने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दि. १६ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी : श्रीरामपूर – नेवासा रस्त्यावर हॉटेल जय हो समोर, शिरसगाव (ता. श्रीरामपूर) येथे दि. १६ ऑक्टोबर रोजी युवराज अशोक शेळके (रा. समाज मंदिर समोेर, गोंधवणी, वॉर्ड क्र. १, श्रीरामपूर) याने आपल्या ताब्यातील दुचाकी (क्र. एमएच १७ सीजी ८११८)

अविचाराने हयगयीने भरधाव वेगात चालवून पायी चालणारे प्रकाश श्रीपाद साळवे (वय ५५, रा. अशोकनगर, निपाणी वडगाव, ता. श्रीरामपूर) यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
- रेल्वेसाठी मोठा पॅकेज, वंदे भारत स्लीपर ट्रेनसह अमृत भारत रेल्वेचा विस्तार
- विजय सेल्समध्ये iPhone 16 आता अर्ध्या किमतीत-Limited Offer, एक्सचेंज आणि बँक डिस्काउंटसह उपलब्ध
- साध्या लोकलचे एसी लोकलमध्ये रूपांतर; तिकीट दर किती? आराखड्यासाठी आयआयटीची नियुक्ती
- गजकेसरी, धन आणि रवि योगांचा प्रभाव; वृषभ ते मीन राशींसाठी भाग्यवर्धक दिवस
- बँक खाते आणि क्रेडिट कार्डसाठी वेगवेगळे मोबाइल नंबर असतील तर कर्ज अडकेल का? जाणून घ्या संपूर्ण सत्य













