अ.नगर ऐवजी अहमदनगर नाव वापरण्याची मागणी

Published on -

श्रीरामपूर : अ.नगर ऐवजी अहमदनगर या नावाचा वापर करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे शहर अध्यक्ष फहीम शेख यांनी श्रीरामपूर आगारप्रमुखांकडे केली आहे.

 

आगारप्रमुखांना दिलेल्या पत्रात शेख यांनी म्हटले आहे की, बसस्थानकात अहमदनगर या नावाऐवजी अ.नगर असा जिल्ह्याच्या नावाचा उल्लेख होत आहे. वास्तविक पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या नावाचा उल्लेख करताना अहमदनगर, असा करण्याचे आदेश दिले आहेत.

 

मात्र श्रीरामपूर बसस्थानकातील प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झालेले आहे. तरी या आदेशाची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी शेख यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe