श्रीरामपूरमध्ये एकाच रात्रीत सात ठिकाणी चोऱ्या

Ahmednagarlive24
Published:

श्रीरामपूर: प्रभात दूधचे सारंगधर निर्मळ यांच्या बंगल्यातील चोरीची घटना ताजी असतानाच खैरी निमगाव येथील सात घरांतून सोन्याच्या दागिन्यांसह लाखो रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला. खैरी निमगाव येथील राजेंद्र ढोबळे हे पत्नी, मुलांसह दिवाळीत अंदरसुलला गेले होते.

चोरट्यांनी कटरने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा कापून आत प्रवेश केला. उचकापाचक करत १२ तोळे सोन्याचे दागिने त्यांनी चोरून नेले. त्यांच्या शेजारी राहत असलेले माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे स्वीय सहायक अप्पासाहेब दुशिंग यांच्या घरातदेखील त्याच पद्धतीने प्रवेश करत दोन तोळे सोने आणि ४ हजार रुपये लांबवण्यात आले.

माजी तंटामुक्ती अध्यक्ष गोपीचंद भागडे यांच्या घरातील अडीच तोळे सोने आणि १२ हजार रुपये, भानुदास कचरू जाधव यांच्या घरात आवारातून प्रवेश करत संदीप जाधव यांच्या खिशातील पाकिटातून ७ हजार ३०० रुपये, मुलीच्या गळ्यातील ओम चोरट्यांनी लांबवला.

लीलाबाई पंढरीनाथ जोजे आणि देवराम तुपे यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा कटरने तोडून सामानाची उचकापाचक चोरांनी केली. घरी कोणी नसल्याने कितीची चोरी झाली हे समजू शकले नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment