५ वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी मारून महिलेची आत्महत्या

Published on -

श्रीरामपूर ;- तालुक्यातील वडाळा महादेव शिवारात राहणाऱ्या अश्विनी दीपक सोनुले (वय २६) या विवाहितेने आपल्या ५ वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

नेवासे रस्त्यावरील साक्षी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे मारुती राऊत यांच्या विहिरीत या महिलेने शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास मुलीसह उडी घेतली.

लोकांच्या ही गोष्ट लक्षात येताच शोधमोहीम सुरू केली. दुपारी महिलेचा मृतदेह सापडला. मुलीचा मृतदेह शोधण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe