बेकायदा गर्भपातप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा 

Published on -
जामखेड – अकलूज येथे बेकायदेशीर गर्भलिंग निदान करून स्रीगर्भ असल्याचे समजताच जामखेड येथील दुकानातून गोळ्या घेऊन गर्भपात केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मच्छिंद्र वायफळकर, शिवाजी कपणे व पाटील (पूर्ण नाव माहीत नाही), दोन महिलांसह लिंगनिदान करण्यासाठी मदत करणारा डॉक्टर अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील आरोळेवस्ती येथील विवाहितेने अकलुजजवळील एका गावातील पाटील नावाच्या व्यक्तीकडे बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करून घेतली.
तपासणीत स्त्रीगर्भ निघाल्याने कुटुंबाने जामखेड येथील एका औषध दुकानदाराकडून गर्भपात करण्यासाठी गोळ्या घेतल्या. पूर्ण गर्भपात न झाल्याने महिलेस त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी तिला डॉ. युवराज खराडे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

 

डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी विचारणा केल्यावर खरा प्रकार समजला. डॉ. खराडे यांनी ही घटना पोलिसांना कळवली.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe