सराफ बाजारात चोरी, १ लाख ६१ हजारांचा ऐवज लंपास!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर : शेवगाव येथील शिवाजी चौकातील सराफ बाजारात चोरी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी रविंद्र भिमाशंकर डहाळे यांनी ८ नोव्हेंबरला फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

श्री. डहाळे यांच्या घरात घुसून घरातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ६१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पुढील तपास पोहेकॉ. बी.बी. ताके हे करत आहेत. साकेगावात नांगराची चोरी पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथे डबल पल्टी असलेल्या २५ एचपी नांगराची चोरी झाली. ही घटना ६ नोव्हेंबर रोजी घडली.

या प्रकरणी गोरक्षनाथ कोंडीराम वाघ (वय ४२, रा. साकेगाव) यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. चोरीस गेलेल्या नांगराची किंमत २० हजार रुपये इतकी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment