अहमदनगर : ”शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाशिवआघाडी करून सत्तास्थापन करत आहेत. मात्र युतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेचा फॉर्म्युला ठरवून दिला आहे. तो शिवसेनेने आठवायला पाहिजे.
त्यानुसार ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, असे युती असताना दिलेला हा फॉर्म्युला आहे. तो शिवसेनेने जपला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. खा. डॉ. सुजय विखे पाटील नगर शहरात तीन दिवस दौर्यावर आहेत.

खा. डॉ. विखे पाटील म्हणाले, ”राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना मित्रपक्षांच्या महायुतीला कौल दिला आहे. या जनादेशाचा आदर शिवसेनेने केला पाहिजे. भाजपने सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला चांगला प्रतिसाद दिला होता. परंतु काही अडथळे आले.
शिवसेनेने सत्तेचे बदलल्या समीकरणामुळे जनतेच्या विश्वासला तडा जात आहे”. शिवसेना मागत असलेल्या मुख्यमंत्रीपदाबाबत ठरलं होतं का, यावर खा. विखे पाटील म्हणाले, ”हे मला माहित नाही. ज्यावेळी ठरत होतं. ते बंद खोलीत ठरत होतं.
आम्ही खोलीबाहेर बसत होतो. त्यामुळे ते आपल्याला माहित नाही. परंतु जनतेने महायुतीला कौल दिला आहे. हे मात्र काळ्या दगडावरची रेघ आहे”.राज्यात कोणाचीही सत्ता येवो. कोणत्याही पक्षाचा मुख्यमंत्री होवो.
परंतु मुख्यमंत्र्यांनी आल्याबरोबर शेतकर्यांच्या बाजूने निर्णय घेतला पाहिजे. अतिपावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांना एकरी २५ ते ३० हजार रुपये मदत मिळाली पाहिजे. यासाठी मी सत्ताधारी पक्षात असलो, तरी शेतकर्यांसाठी लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन आंदोलन करेल, असा इशारा खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी दिला.
- रेल्वेसाठी मोठा पॅकेज, वंदे भारत स्लीपर ट्रेनसह अमृत भारत रेल्वेचा विस्तार
- विजय सेल्समध्ये iPhone 16 आता अर्ध्या किमतीत-Limited Offer, एक्सचेंज आणि बँक डिस्काउंटसह उपलब्ध
- साध्या लोकलचे एसी लोकलमध्ये रूपांतर; तिकीट दर किती? आराखड्यासाठी आयआयटीची नियुक्ती
- गजकेसरी, धन आणि रवि योगांचा प्रभाव; वृषभ ते मीन राशींसाठी भाग्यवर्धक दिवस
- बँक खाते आणि क्रेडिट कार्डसाठी वेगवेगळे मोबाइल नंबर असतील तर कर्ज अडकेल का? जाणून घ्या संपूर्ण सत्य













