लोणी : ज्या माणसाने ५ वर्षे आपल्यासाठी रात्रंदिवस काम केले, विखे पाटील कुटुबियांनीही सामाजिक विकास कामांसाठी प्रयत्न केले अशा माणसासाठी डोळे झाकुन येणा-या विधानसभा निवडणूकीत पुन्हा एकदा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडूण द्या असे आवाहन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.
प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहात अन्नसुरक्षा योजनेत नव्याने समावेश करण्यात आलेल्या लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी खा.डॉ.सुजय विखे पाटील बोलत होते. यावेळी मार्गदर्शन करताना खा.डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, शिर्डी विधानसभा मतदार संघात काम करत असताना ७ वर्षांमध्ये अनेक कार्यक्रम घेण्यात आले.

ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली असंख्य योजना राबवुन त्याचे वितरणही केले पण आनंद या गोष्टीचा वाटतो की, हा पहिला कार्यक्रम आहे की त्यात मी खासदार म्हणुन आपल्या सर्वांच्या समोर उभा आहे. अनेक लोकांना हा प्रश्न पडतो की, मी लोकसभा निवडणूक उभा राहीलो, मोठा संघर्ष उभा राहीला, राज्यातील आमचे सर्व विरोधक एक झाले, सभा झाल्या तरी सुध्दा ३ लाखांच्या मताधिक्याने मी खासदार झालो.
मला लोकांनी विचारल की तुम्ही नेमक घाबरले कशाला, तुम्हाला पक्षाने तिकीट नाही दिल, तुम्ही भारतीय जनता पक्षात गेले आणि एवढा सगळा संघर्ष करुन तुम्हाला कधी भिती वाटली नाही याच नेमक कारण काय तेव्हा माझ्या पाठीशी या परिसरातील गोरगरीब, सर्वसामान्य जनतेचा आधार आणि आशिर्वाद आहे आणि तो कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती सौ. हिराबाई कातोरे, उपसभापती बाबासाहेब म्हस्के, तहसीलदार माणिक आहेर, गटविकास आधिकारी समर्थ शेवाळे, शिर्डीच्या नगराध्यक्ष सौ.अर्चनाताई कोते, ट्रक सोसायटीचे चेअरमन नंदू राठी, जी.प सद्स्य दिनेश बर्डे, पं.स शाम माळी, कविताताई लोहारे, सौ. पुष्पाताई रोहम, सदस्य उमेश जपे, सुवर्ण तेलोरे, अर्चना आहेर, शोभा जेजुरीकर, कळू राजपूत, संतोष ब्राह्मणे, नंदाताई तांबे, भरत अंत्रे , बाळासाहेब डांगे, मारुती गोरे, भारत घोगरे यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजपर्यंत सात वर्षात दुसरं काम केल नाही. रेशनकार्डसाठी जनतेला पैसे द्यावे लागत होते हे लक्षात आल्यावर पुर्णपणे भ्रष्टाचार बंद करुन प्रत्येक गावामध्ये रेशनकार्डचे कॅम्प घेतले आणि १८ हजार रेशनकार्ड आपण फ्री वाटप केले. हे महाराष्ट्रात कुठे घडले नाही ते आपल्याकडे घरपोहच मिळाले.
फक्त माझा माणूस गावात आला रेशनकार्डसाठी लागणारे कागदपत्रे जमा केले, त्यासाठी तहसिल कार्यालयात नियमानुसार ५० रुपये फी आकारली जाते ती फी सुध्दा मी स्वत: भरुन रेशनकार्ड घरपोहच केल्यामुळे आज ९० टक्के घरांमध्ये रेशकार्ड गेल आहे. तो आशिर्वाद माझ्या पाठीशी आहे. अपघाती विमा योजनेतून शिर्डी विधानसभा मतदार संघातील दिड लाख मतदारांचा विमा उतरविला.
४ वर्षात अपघाती विम्याचे हप्ते व्यक्तीगत माझ्या खात्यातून ८५ लाख रुपये मी भरले आणि यातून अडीच कोटी रुपये आपण गरीबांना वाटले. शिर्डी विधनसभा मतदार संघातील अपघातात मृत्यु झालेल्या मयताच्या वारसाला दोन लाख रुपयांचा चेक आपण देतो.
राज्यात असे राजकारणी लोक आहेत की, ते फक्त मयताच्या घरावर जावून सांत्वन करतात पण राज्यात आपण एकमेव आहोत की त्या घरामध्ये जावून सांत्वन तर करतोच, पण त्यांच्या दुखामध्ये सहभागी होवून २ लाख रुपयांचा धनादेश देणाचे काम ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण करतो.
दोन वर्षापासुन माझा मानस होता की, या मतदार संघात एकही गरीब स्वस्त धान्यापासुन वंचित राहता कामा नये त्यामुळे गरज नसणा-या लोकांची नावे कमी करुन १५ हजार गरीब लोकांची नावे अन्न सुरक्षा यादीत समाविष्ठ करुन त्यांना धान्य सुरु केले.
मतदार संघातील जनतेसाठी आपण रात्रंदिवस काम करुन आज पुन्हा नव्याने १८ हजार नावांचा नव्याने समावेश या अन्न सुरक्षा यादीत करण्याचे काम ना.विखे पाटील यांनी केले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाहीलेल स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने आपण काम करणार आहोत. २५ हजार गरीबांना धान्य सुरु करण्याचे काम ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
तुमच्यामुळे ना.विखे पाटील आज महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत. गृहनिर्माण म्हणजे प्रत्येकाला घर देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.
गृहनिर्माण मंत्री होत असताना आपल्याला दोन महीने मिळाले. लोकसभा निवडणूकी नंतर आता एका महीन्यात विधानसभा निवडणूका सुरु होतील या निवडणूकीत कोणी किती जरी प्रयत्न केले तरी राज्यात कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचच सरकार सत्तेवर येणार आणि त्यामध्ये पुन्हा एकदा ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रीपदाची संधी मिळणार असल्याचे ठाम मत खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.
मागील विधानसभा निवडणूकीत शिर्डी विधानसभा मतदार संघाने ७५ हजारांचे मताधिक्य दिले याचे सर्व उपकार फेडत आज सगळी कामे आपण केली आहेत. जनता,सर्वसामान्य माणूस आपल्या बरोबर राहीला म्हणून ही सर्व कामे करायला आम्हाला एक वेगळी उर्जा मिळाली.
त्याच पार्श्वभूमीवर एका महीण्यानंतर येणा-या विधानसभा निवडणूकीत विरोधी उमेदवार आहे की नाही ही साशंकता आहे. ना.विखे पाटील यांना जास्तीत जास्त मतांनी निवडुन द्यायची जबाबदारी ही शिर्डी विधानसभा मतदार संघामध्ये प्रत्येक व्यक्तिची आहे.
हे मतदान भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक माणसाला करा मी तुम्हाला विश्वास देतो, मी दिलेला रेशनकार्डचा, अन्न सुरक्षा यादीत समावेश करण्याचा शब्द पाळला आहे. येत्या निवडणूकीत ना.विखे पाटील पाटील यांना १ लाखांच मताधिक्य देवून निवडुन द्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा गृहनिर्माण मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर ५ वर्षांमध्ये या मतदार संघात एकाही नागरीकाला घराशिवाय राहायची गरज पडणार नाही हा शब्द मी देतानाच २०२२ पर्यंत प्रत्येक नागरीकाला हक्काच घर मिळाल पाहीजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. मी दिलेला शब्द आजपर्यंत पडू दिलेला नाही, आपली जबाबदारी आहे आपण कुटूंब म्हणून काम करतो.
आपण प्रत्येक घटकाला कुठलीही योजना राबविताना जात, धर्म, भेदभाव, कोण कोणत्या पक्षाचा आहे ही भावणा ठेवत नाही आणि म्हणून आनंद वाटतो की, ३ दिवसांमध्ये खा.सदाशिव लोखंडे यांना ६५ हजारांचे मताधिक्य या शिर्डी विधानसभा मतदार संघाने दिले असल्याचे आठवन त्यांनी त्यांनी करुन दिली. आजपासुन मतदार संघातील प्रत्येक गावात आयुष्यमान भारत योजनेचा कॅम्प आयोजित करुन एका महिण्यात कार्डचे वाटप केले जाणार आहे.
त्या कार्डसाठी प्रत्येकी १०० रुपये येणारा खर्च हा जनसेवा फौंडेशन भरणार आहे. योजनेचा लाभ तुमच्या पर्यंत पोहचविण्याची जबाबदारी माझी आहे. या मतदार संघातील प्रत्येक गोरगरीब, सामान्य जनता ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठीशी उभी आहे हे मतदानातून सिध्द करायच आहे .
सत्ता कोणाचीही असो पण सातत्याने गोरगरीबांच्या कल्याणाचे काम ना. विखे पाटील यांनी केले आहे. शिर्डी विधानसभा मतदार संघात जेवढी लोक अतिक्रमीत जागेवर अतिक्रमन करुन राहत आहेत अशा सर्व लोकांना ते राहत असलेली जागा त्यांच्या नावावर केल्याशिवाय परत मत माघायला येणार नसल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
- ऑक्टोबरमध्ये लाँच होणार Vivo कंपनीचे ‘हे’ दोन स्मार्टफोन !
- शेअर मार्केटमधील ‘ही’ आयटी कंपनी देणार 5.75 रुपयांचा Dividend ! रेकॉर्ड डेट कोणती?
- केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांनंतर आता ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पण वाढला! वाचा डिटेल्स
- ग्राहकांसाठी सुवर्णसंधी ! 100x झूम आणि 50 MP कॅमेरा असणारा ‘हा’ विवोचा स्मार्टफोन 10,000 रुपये स्वस्तात मिळणार
- टाटा समूहाच्या ‘या’ शेअरमध्ये 5 दिवसात 35 टक्क्यांची वाढ, कारण काय?