रोज नऊ तास झोपण्यासाठी ही कंपनी देईल एक लाख रुपये 

Published on -
रोज तेच तेच काम करून अनेकजण पार कंटाळून जातात. एवढे नोकरी सोडून द्यावी, अशीही त्यांची बऱ्याचदा इच्छा होते. नोकरी सोडून काहीतरी वेगळे करावे, असेही वाटत असते.

अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यातही झोप प्रिय असलेल्या लोकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण आता अशा एका नोकरीची ऑफर आली आहे, ज्यात तुम्हाला फक्त झोप काढण्याचे काम करायचे आहे. विशेष म्हणजे ही कंपनी भारतीय आहे.
वेकफिटडॉटको नावाच्या या कंपनीने स्लीप इंटर्नशिप नावाचा एक प्रयोग समोर आला आहे. या इंटर्नशिपदरम्यान तुम्हाला नऊ तास झोपायचे आहे. एखादा उमेदवार सलग शंभर दिवस हे झोपायचे काम करू शकला तर त्यासाठी त्याला एक लाख रुपये दिले जातील. मात्र हे काम वाटते तेवढे सोपे नाही. ही नोकरी मिळविण्यासाठी झोप तुमच्यासाठी किती आणि का प्रिय आहे, हे तुम्हाला कंपनीला पटवून द्यावे लागेल.
इंटर्नशिप प्रोग्रामदरम्यान कंपनी व्यक्तीच्या झोपेच्या पद्धतीवरही नजर ठेवणार आहे. म्हणजे तुम्ही बिछान्यावर कसे झोपता, तसेच कंपनीकडून सल्लागार व स्लीप ट्रॅकरही दिले जातील. वेकफिटडॉटकोचे संस्थापक संचालक चैतन्य रामलिंगेगौडा यांनी सांगितले की, या नोकरीसाठी आम्ही देशातील सर्वोत्तम झोपाळू व्यक्तींचा शोध घेत असून जे झोपेसाठी काहीही करू शकतात.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News