अडीच लाखांच्या दागिन्याची चोरी

Ahmednagarlive24
Published:

लोणी :- लोणी खुर्द येथील संजय सोपान आहेर (वय ५३) हे व कुटुंबिय घरात झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला.

घरात ठेवलेले सोन्याचे दागिने व टायटन कंपनीचे मनगटी घड्याळ असा दोन लाख ४२ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. दि. २ डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा ते दि. ३ डिसेंबर पहाटे तीन वाजेच्यादरम्यान ही घटना घडली.

याप्रकरणी आहेर यांनी लोणी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment