पत्रकार हत्या प्रकरणी अधिकाऱ्याला अटक

Published on -

त्रिपुरा – पत्रकार सुदीप दत्ता भौमिक यांच्या हत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) त्रिपुरा स्टेट रायफल्सच्या तिसऱ्या बटालियनचा सहायक कमांडेंट स्वरूपानंद विश्वास याला अटक केली. 

त्याला त्रिपुरा पोलिस सर्व्हिसच्या ताब्यात ठेवण्याची मागणी करत सीबीआयने गुरुवारी न्यायालयात याचिका दाखल केली. विश्वास याला बुधवारी रात्री अटक करण्यात आली असून त्याला वेस्ट आगरतळा पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.

या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी सीबीआयला आरोपीला कोलकात्याला न्यायचे आहे. टीव्ही पत्रकार सुदीप दत्ता भौमिक यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. यात बटालियन कमांडंट तपन देववर्मा याचाही समावेश आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!