मॅक्सस्क्वेअर कंपनीकडून ५३ लाख ४० हजारांची फसवणूक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर : येथील मॅक्सस्क्वेअर क्युरिज इंडिया प्रा. लि. च्या माध्यमातून गुंतवणुक करणाऱ्यांची फसवणुक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तब्बल ५३ लाख ४० हजाराची फसवणुक झाली असून या प्रकरणी चंद्रकांत आनंदा गवळी (वय ५०, रा. वाकोडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

गवळी यांच्या फिर्यादीनुसार कंपनीशी निगडीत असलेले सचिन कारभारी साळुंके व युवराज सोपान रणसिंगे या दोघांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात ८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. सदरची कंपनीत भिशी पद्धतीने व्यवहार केले जात होते.

व्यवहारातूनच ज्यांनी गुंतवणुक केली त्यांची फसवणुक झाली आहे. अहमदनगर : येथील मॅक्सस्क्वेअर क्युरिज इंडिया प्रा. लि. च्या माध्यमातून गुंतवणुक करणाऱ्यांची फसवणुक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तब्बल ५३ लाख ४० हजाराची फसवणुक झाली असून या प्रकरणी चंद्रकांत आनंदा गवळी (वय ५०, रा. वाकोडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

गवळी यांच्या फिर्यादीनुसार कंपनीशी निगडीत असलेले सचिन कारभारी साळुंके व युवराज सोपान रणसिंगे या दोघांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात ८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. सदरची कंपनीत भिशी पद्धतीने व्यवहार केले जात होते.

व्यवहारातूनच ज्यांनी गुंतवणुक केली त्यांची फसवणुक झाली आहे. याबाबत फिर्यादीनुसार पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, मॅक्सस्क्वेअर क्युरिज इंडिया प्रा. लि. कार्यालय प्रेमदान चौकातील डौले हॉस्पिटल शेजारी होते. या कंपनीत फिर्यादी चंद्रकांत गवळी यांनी २५ लाखाची रक्कम भरली होती.

मोहन नाथा दुसुंगे (रा. नेहरू चौक, भिंगार) यांनी ५ लाख, किशोरकुमार रामपाल प्रजापती (रा. भिस्तबाग चौक) यांनी ८ लाख ९० हजार रुपये, अनिल श्रीमल पितळे (रा. नवी पेठ) यांनी ७ लाख रुपये, रामचंद्र दशरथ बोडवे (रा. भिंगार) यांनी ७ लाख ५० हजार रुपये गुंतवणुकीच्या माध्यमातून भरले होते. मात्र संबंधित कंपनीने गुंतवणुक करणाऱ्यांना व्याजास्वरूपात कुठलाही मोबदला न देता तब्बल ५३ लाख ४० हजार रुपयांची फसवणुक केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment