रस्ता खराब असल्यामुळे झालेल्या अपघातात महिला ठार

Ahmednagarlive24
Published:

टाकळीभान | टाकळीभान – घोगरगाव रस्त्यावर धुमाळवस्तीजवळ रविवारी सकाळी ८.३o च्या दरम्यान अपघात झाला.

या अपघातात मारियाबाई ज्ञानदेव शिरसाठ (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. घोगरगावहून लग्न समारंभासाठी निघालेल्या मारिया शिरसाठ व शिरसाठ हे हीरो होंडा मोटारसायकलीवरून (एमएच १२ व्ही ३६६४) टाकळीभानच्या दिशेने चालले होते.

घोगरगावकडून टाकळीभानकडे चाललेला टेम्पोची (एमएच १६ ए ई ५१०९) धुमाळवस्तीजवळ धडक होऊन अपघात झाला.

यात महिला जागीच ठार झाली, तर मोटारसायकलस्वार किरकोळ जखमी झाला.

अपघात झाल्यावर टेम्पोचालक टेम्पो सोडून पळून गेला. टाकळीभान दूरक्षेत्राचे हेडकॉन्स्टेबल पवार व पोलिस मित्र बाबा सय्यद यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

टेम्पो रस्त्यात असल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतुकीची कोंडी झाली होती. रस्ता खराब असल्यामुळे अपघात झाल्याचे निदर्शनास आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment