नवी दिल्ली : सरकारी तेल विपणन कंपनी भारत पेट्रोलियम यामधील आपली हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत मोदी सरकार असून ती खरेदी करण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) तयार असल्याचे सांगण्यात येत आहे.
एका पाहणी संस्थेच्या माहितीनुसार इंडियन ऑईल कॉर्पोरेशनही यासाठी बोली लावण्यास तयार आहे.निर्गुंतवणुकीच्या बाबतीत सरकारच्या बीपीसीएलमधील ५३.२९ टक्के अशी पूर्ण हिस्सेदारी विकण्याची शिफारस कोर ग्रुपने केली आहे.

या सचिवांच्या समितीकडूनही कंपनीतील सरकारची पूर्ण हिस्सेदारी विकण्याबाबत शिफारस केली गेली होती. त्यानंतर सरकारी तेल कंपनी बीपीसीएलच्या खासगीकरणाची शक्यता वाढली.
आता मंत्रिमंडळ मंजुरीसाठी केवळ औपचारिकता शिल्लक आहे, असे या संबंधात या संशोधन पाहणी कंपनीने म्हटले आहे.ज्या कायद्यानुसार बीपीसीएलचे राष्ट्रीयीकरण केले गेले होते, तो हटवण्यात आला आहे. अशामध्ये या संबंधात तसे पाहिले तर काही कायदेशीर अडचण नाही.
गुंतवणूकदारांना पाठवण्यात आलेल्या नोंदीत या संशोधन कंपनीने म्हटले आहे की, रिलायन्स तेलशुद्धीकरण व केमिकल या क्षेत्रातील आपली हिस्सेदारी कमी करू इच्छित आहे. त्यामुळे कर्ज शून्यावर आणू इच्छित आहे.