सकाळच्या चहाने मेंदूचे आरोग्य सुधारू शकते का?

Ahmednagarlive24
Published:

सकाळी सकाळी चहाचे घोट घेण्याचा आनंद वेगळाच असतो. आपल्या देशात तर अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात चहाचा घोट घेतल्याशिवाय होतच नाही. 

चहा पिल्याने थकवा, मरगळ दूर होते, हे आतापर्यंत तुम्ही ऐकले असेल. मात्र आता एका ताज्या अध्ययनातून चहाशौकिनांना मोठा दिलासा देणारी बाब समोर आली आहे. 

या अध्ययनानुसार, चहा पिल्याने तुम्हाला फक्त ऊर्जाच मिळत नाही तर कुशलता आणि मेंदूच्या आरोग्यतही सुधारणा होते. चहाचे वेगवेगळ्या प्रकारे सेवन केले जाते. 

आशियात बारीक केलेली चहापत्ती व अन्य उत्पादनांसोबतचा चहा अतिशय प्रचलित आहे. या अध्ययनात शास्त्रज्ञांना असे दिसून आले की, चहा सृजनशील क्षमता टिकवून ठेवणे व ज्ञानासंबंधी घसरण रोखण्याच्या भूमिकेशी संबंधित आहे. 

बीजिंगमधील सिंघुआ विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी सांगितले की, या अध्ययनासाठी चहा पिण्याच्या इतिहासानुसार निरोगी लोकांचे दोन गटांचा समावेश केला व मेंदू संघटनावर चहा पिण्याची भूमिका प्रकट करण्यासाठी कार्यात्मक व सृजनात्मक दोन्ही नेटवर्कची तपासणी केली. त्यात त्यांना चहा अल्झाइमर दूर करण्यासही मदत करतो, असे दिसून आले. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment