सरकारी नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक

Published on -

राहाता : सरकारी खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी राहाता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, महेश सुनील बनसोडे (वय २१, धंदा ड्रायव्हींग, रा. साकुरी दत्तनगर, ता. राहाता) व त्याच्या मित्राकडून महेश शैलेश गाढवे (रा. गणेशनगर, ता. संगमनेर) याने सरकारी खात्यात नोकरी लावून देण्याचा विश्वास दाखविला. 

त्याकरिता त्यांच्याकडून दि. २५ जुलै ते २६ ऑगस्ट या दरम्यान एक लाख ३० हजार रुपये रोख तसेच बँकेद्वारे घेतले. मात्र, कालावधी उलटूनही नोकरी लागत नसल्याने आपला विश्वासघात झाल्याचे लक्षात येताच महेश बनसोडे याने राहाता पोलिसात महेश गाढवेविरुद्ध फिर्याद दाखल केली. 

यावरून राहाता पोलिसांनी गु. र. नं. २३३/२०१९ भा. दं. वि. कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe