रोज अर्धा तास व्यायाम करा आणि मृत्यू टाळा !

Ahmednagarlive24
Published:

न्यूयॉर्क : निरोगी शरीरासाठी व्यायाम आवश्यक आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. ते सगळ्यांनाच माहीत आहे. नियमित व्यायामामुळे अनेक प्रकारचे घातक आजार दूर ठेवले जाऊ शकतात.

खासकरून मधुमेह, ह्रदयाचे विकार यांसारख्या समस्यांपासून मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळू शकतो. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, दररोज अर्धा तास व्यायाम केल्यामुळे अकाली मृत्यूचा धोक्याची शक्यता टाळली जाऊ शकते.

नियमित व्यायामाच्या मदतीने १२ पैकी एका व्यक्तीला मृत्यूच्या दारात जाण्यापासून रोखले जाऊ शकते. शास्त्रज्ञांनंी १७ देशांमध्ये एकाच वेळी अध्ययन करून यासंबंधीचा खुलासा केला आहे. या अध्ययनात सगळ्याच घटकांतील लोकांना समाविष्ट करण्यात आले होते.

शास्त्रज्ञांनी सांगितले की, शारीरिक हालचाली जास्त झाल्यामुळे ह्रदयाचे विकार व त्यांच्या घातक प्रभावांपासून बचाव केला जाऊ शकतो. एका आकडेवारीनुसार, ह्रदयाशी संबंधित आजारांमुळे जगभरात दरवर्षी मोठ्या संख्येने लोकांना आपला जीव गमवावा लागतो. दररोज ३० मिनिटांच्या शारीरिक हालचालींतून हा धोका टाळला जाऊ शकतो. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment