नगर : पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून, तर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा मतदारसंघातून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्ह्यात मंगळवारी एकूण सात उमेदवारांनी दहा उमेदवारी अर्ज दाखल केले.
मंगळवारअखेर एकूण १७ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यातील सर्व बारा विधानसभा मतदारसंघामध्ये मिळून तब्बल ११३ इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. मंगळवारी कर्जत-जामखेड मतदारसंघातून प्रा.राम शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाकडून दोन अर्ज दाखल केले.
बबनराव पाचपुते यांनीही श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपकडून अर्ज दाखल केला. नेवासा मतदारसंघात नेवासे पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता शंकरराव गडाख यांनी एक अर्ज क्रांतिकारी शेतकरी पक्ष व एक अर्ज अपक्ष असे एकूण दोन अर्ज, पारनेर मतदारसंघात भाऊसाहेब माधव खेडेकर यांनी अपक्ष आणि निलेश ज्ञानदेव लंके यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने अर्ज दाखल केला.
- कृष्णा गोदावरी खोऱ्याकरिता स्थापन करण्यात येणार निवृत्त अनुभवी अधिकाऱ्यांचे सल्लागार मंडळ- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- वापरा ‘हा’ फॉर्म्युला आणि PPF योजनेत पैसे गुंतवा! मिळेल लाखो करोडोत परतावा
- कमी पगारात देखील पैसे वाचवा आणि वाढवा! ‘या’ टिप्स फॉलो करा,होईल फायदा
- भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा शेअर देईल प्रचंड पैसा! मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने जारी केला रिपोर्ट
- लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी फायद्याचा ठरेल रेल्वे विकास निगम लिमिटेडचा शेअर! तज्ञांनी दिले संकेत