सातव्या महिन्यादरम्यान ही पाठदुखी दिसून येत असल्याचे अस्थिविकारतज्ज्ञ आणि संशोधक सांगतात.
यासाठी कारणीभूत असणारे घटक खालीलप्रमाणेे-

शरीराचे गुरुत्व केंद्र बदलून ते पुढील बाजूस येते. यामुळे पाठीच्या खालच्या भागावरील दाब वाढतो आणि त्यामुळे कण्यावर अतिरिक्त भार येतो..पोट आणि कुल्ह्यांमधील स्नायू कमकुवत झाल्यामुळेसुद्धा कण्यावर भार पडतो.
ज्यांची जीवनशैली कृतिशील आहे, त्यांच्या तुलनेत बैठी जीवनशैली असलेल्यांना पाठदुखी होण्याची शक्यता अधिक असते. .
ज्या महिलांना गरोदरपणात शारीरिक कष्टांचे काम करावे लागते, त्यांना या अवस्थेत पाठदुखीचा संभव असतो. म्हणजेच कोणत्याही प्रकारची अतिरेकी हालचाल होता कामा नये.
तरुण वय आणि आधी झालेल्या अनेक प्रसूती हेसुद्धा पाठदुखीचे प्रमाण वाढण्याचे कारण आहे..या दुखण्याकडे दुर्लक्ष केल्याने मातेच्या आरोग्यावर परिणाम होतो.
५० टक्के गरोदर महिलांना गरोदरपणात किंवा प्रसूतीनंतरच्या सहा महिन्यांच्या काळात कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या पाठदुखीला सामोरे जावे लागते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काहींना हा त्रास बऱ्याच कालावधीपर्यंत सहन करावा लागतो.
गरोदर असताना त्या स्त्रीसाठी पाठदुखीवरील उपचार उपलब्ध नसतात, कारण विकसित होणाऱ्या गर्भावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
काही उपचार सुरक्षित असले, तरी ज्या कारणामुळे पाठदुखी उद्भवली आहे, त्यावर ही औषधोपचार करीत नाहीत, जोपर्यंत शरीर या दुखण्यावर मात करण्यासाठी तयार होत नाही, तोपर्यंत केवळ वरवरच्या लक्षणांवर उपचार करतात.