पीरियड्सदरम्यान महिलांच्या शरीरात अनेक प्रकाराचे हॉर्मोनल चेंजेस होत असतात. काही महिलांना खूप वेदना सहन कराव्या लागतात, तर काही महिलांसाठी हे दिवस इतर सामान्य दिवसांप्रमाणे असते..
पीरियड्सदरम्यान व्यायाम करायचा की नाही, याबद्दल अनेक महिला गोंधळलेल्या असतात. एका बाजूला पोटदुखी तर दुसऱ्या बाजूला व्यायाम सुटल्यामुळे होणारं नुकसान. अशात जाणून घ्या की, आपण स्वत:ला कशा प्रकारे फिट ठेवू शकता.
हलका व्यायाम करावा. अनेक लोकांप्रमाणे यादरम्यान अधिक शारीरिक श्रम घेतल्याने अधिक ब्लडिंग होते. अशात डॉक्टर्सदेखील हलका व्यायाम करण्याचा सल्ला देतात. यादरम्यान कोणते व्यायाम करावे, याचे शेड्यूल करावे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये स्ट्रेचिंग करणे टाळावे.
तसेच यादरम्यान व्यायामापेक्षा योगा करणे अधिक फायदेशीर ठरेल. याने वेदना सहन करण्याची क्षमता वाढेल आणि फ्रेश वाटेल. तरी शीर्षासन, सर्वांगासान, कपालभातीसारखे आसन करू नये.

यादरम्यान प्राणायाम आपल्यासाठी फायद्याचे ठरेल. तसेच अनुलोम-विलोम केल्याने हलकं जाणवेल. हलका व्यायाम आणि योगा केल्याने स्वत:ला फिट जाणवेल आणि नियमही मोडणार नाही..
पीरियड्स सुरू होण्यापूर्वी मूड स्विंग होणे अगदी सामान्य आहे. अशात अनेक बायका चिडचिड करू लागतात, तर काहींना डिप्रेशन जाणवतं. अशात सुरुवातीला दोन-तीन दिवस मेडिटेशन केल्याने मूड चांगला राहण्यास मदत मिळेल.