एकेकाळी टोमॅटोला विषारी फळ समजून त्यापासून लोक दूर राहात होते, मात्र आता टोमॅटो जगभरातील लोकांच्या आहारात ठाण मांडून बसला आहे.
केवळ लाल टोमॅटोच नव्हे, तर हिरवा, कच्चा टोमॅटोही आवडीने खाल्ला जातो. या कच्च्या टोमॅटोमध्येही अनेक गुण असतात. त्याचमुळे स्नायू मजबूत होतात, असे संशोधकांनी म्हटले आहे.

हिरव्या टोमॅटोमुळे स्नायूंचा विकास चांगला होतो. आयोवा युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की, हिरव्या टोमॅटोमध्ये ‘टोमॅयिडाइन’ नावाचा घटक असतो. त्याच्यामुळे स्नायूंच्या विकासासाठी व मजबुतीसाठी मदत मिळते.
वृद्धावस्थेत तसेच आजारांमुळे स्नायूंची हानी होतअसते.
ही हानी रोखण्याचे काम हा घटक करू शकतो. जे लोक नियमितपणे हिरव्या टोमॅटोचे सेवन करतात. त्यांच्यामध्ये स्नायूंशी संबंधित समस्या कमी असल्याचे आढळून आले.