गुळाचा हा USE महिनाभरात हिमोग्लोबिन वाढू शकतो!

Published on -

पूर्वी पदार्थांची गोडी वाढविण्यासाठी साखरेपेक्षा अधिक वापर गुळाचा केला जायचा. गूळही साखरेसारखा उसापासूनच तयार केला जातो, पण तरीही गूळ मात्र साखरेपेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर आहे. 

साखरेमुळे हळूहळू गुळाचे महत्त्व आणि वापरही कमी होऊ लागला. गूळपोळी, पुरणपोळी, मोदक, चिक्की, शेंगदाण्याचा लाडू, तिळाचे लाडू यांसारख्या पारंपरिक पदार्थांमध्येही गुळाचा वापर आवर्जून केला जातो, पण हे झालं फक्त सणावारापुरतं. 

एरव्ही मात्र गुळाचा तितकासा वापर होताना दिसून येत नाही, पण गुळाचा आहारात समावेश असायला हवाच. कारण फक्त गोडवा वाढविण्यासाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीदेखील गूळ फायदेशीर आहे.

हे गूळ-शेंगदाणे खाल्ल्याने हिमोग्लोबिन लवकर वाढते.

शारीरिक अशक्तपणा आल्यानंतर गूळ खाल्ल्यास जास्त फायदा होतो.

शरीरातील धातूंची झीज भरून काढण्याचे महत्त्वाचे कार्य गूळ करतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News