नगर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून नगर शहरात शिवसेना लोकशाही च्या मार्गाने प्रचार करत आहे.परंतु विरोधकांकडून घाणेरडे राजकारण केले जात आहे. शिवसेनेच्या प्रचारार्थ मुंबईवरून आलेल्या एलईडी रथाचे चालक व त्याच्या साथीदाराला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस नगर शहरामध्ये असे कृत्य करत असून, नगर शहर मतदारसंघ अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करावा, अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे करणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रा.गाडे म्हणाले की, नगर शहरामध्ये शिवसेनेचा प्रचार चालू असताना आज (दि.14) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सावेडी नाका येथे राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांनी या गाडीवरील चालकास तसेच त्याच्या साथीदारास बेदम मारहाण केली. रवीसिंग इन्द्रपाल सिंह तसेच धीरेन्द्र कुमार या दोघांना मारहाण केली आहे.
या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, त्यांचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेहरे व गाडीचा नंबर आलेला आहे. त्यामुळे पोलिसांनी याचा तात्काळ तपास करावा, अशी मागणी गाडे यांनी केली आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नगर येथे सभा होणार होती. सदरची सभा न होऊ नये म्हणून राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी गांधी मैदान अगोदरच बुक केले. मात्र तेथे राष्ट्रवादीची एकही सभा झाली नाही. राष्ट्रवादीकडून खोडसाळपणा केला जात आहे.
असाच प्रकार नगर शहरामध्ये अनेक ठिकाणी केला जात असल्याचेही संभाजी कदम व बाळासाहेब बोराटे यांनी यावेळी सांगितले.
महापालिका पोटनिवडणूकीतही असा प्रकार घडला. असे प्रकार वारंवार होत असतील, तर पोलिस प्रशासनाने तात्काळ याची दखल घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. त्या घटनेशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही संबंध नसताना शिवसेनेकडून चुकीचा आरोप केला जात असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
- एलपीजी गॅस एजन्सी सुरू करा, दर महिन्याला होणार लाखो रुपयांची कमाई ! एका सिलेंडर मागे किती कमिशन मिळते? पहा…
- पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये गुंतवणूक करताना ‘या’ 7 टिप्स फॉलो करा ! आयुष्यभर पैशांचे टेन्शन राहणार नाही
- अकोले तालुक्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी तालुका बाल संरक्षण समितीची स्थापना
- नेवासा तालुक्याती मंदिरातील टाळ चोरीचा गुन्हा पोलिसांनी २४ तासातच आणला उघडकीस, आरोपींना अटक
- शेतकऱ्यांनो! वास्तव स्वीकारून सात नंबर अर्ज भरा अन्यथा भविष्यात शेती धोक्यात येऊ शकते