पारनेर : स्वतःला कार्यसम्राट म्हणणार्यांनी १४ वर्षात तालुका भकास केला. नुसते सभामंडप बांधून विकास होत नसतो तर लोकांच्या मूलभूत गरजा ओळखायला पाहिजे.
तालुक्यात रस्त्यांची कामे चालू आहेत. मात्र, यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून तयार केलेले रस्ते तीनच महिन्यात उखडतात. हाच तो कार्यसम्राटांचा विकास आहे काय? असे सांगत कडूस ते वाळवणे रस्त्याची अवस्था आज काय आहे? हा कसला विकास म्हणत, नीलेश लंके यांनी ना. औटी यांचे नाव न घेता जोरदार हल्ला चढवला.

सुपा परिसरातील भोयरे गांगर्डा येथे जनसंवाद यात्रे दरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.













