अहमदनगर लाईव्ह24 टीम :- निर्भयाला अखेर न्याय मिळाला आहे. यासाठी मी न्यायव्यवस्था आणि भारत सरकारचे आभार मानते. आजचा दिवस देशातील महिला आणि मुलींच्या नावे समर्पित आहे.
आम्ही फाशीचा आनंद साजरा करणार नाही. पण मी हे जरुर सांगेन की या फाशीनंतर आता गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली.
फाशीच्या काही तास आधी दोषीनी पुन्हा एकदा कायदेशीर डावपेच खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आलं नाही. दोषींचे वकील एपी सिंह यांनी फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली.
परंतु ती फेटाळण्यात आली. यानंतर एपी सिंह सुप्रीम कोर्टात गेले, मात्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळली
न्यायालयाने आरोपींची याचिका फेटाळून लावल्यानंतर न्यायालयाबाहेर आल्यावर निर्भयाच्या आईने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या “आज आमच्यासाठी मोठा दिवस आहे. आज महिलांच्या सुरक्षेचा आणि न्यायाचा दिवस आहे.
आजचा दिवस न्यायदिवस म्हणून ओळखला जाईल. आज माझ्या मुलीला न्याय मिळाला. आजचा दिवस हा महिलांचा आहे. उशिरा का होईना आम्हाला न्याय मिळाला. यासाठी सर्वांचे आभार. न्यायव्यवस्थेचेही आभार मानते,” अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने नोंदवली.
ज्या प्रकारे त्यांची फाशी पुढे ढकलली गेली त्यातून न्यायव्यस्थेतील कमतरता दिसून आली. परंतु आम्हाला न्याय मिळाला, न्यायव्यवस्थेवर विश्वास कायम राहिल, असंही निर्भयाची आई म्हणाली.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com