अहमदनगर : नगर – पुणे रोडवरील वाडेगव्हाण शिवारात दरोडा टाकल्याचे परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. ही घटना १४ ऑगस्टला घडली असून, १५ रोजी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.
अविनाश सुभाष ढोरमले यांच्या फिर्यादीनुसार नितीन पांडुरंग शेळके, किशोर यादव, अजय शेळके, विजय शेळके, गणेश कोहोकडे, गोरख मोटे, राहुल यादव, अक्षय कचरे, संदीप चौधरी, सचिन पांडुरंग शेळके यांच्यासह ५ ते ६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.

फिर्यादी हा त्याच्या मित्राच्या गाडीमध्ये बसून शिरुर येथे जात असताना त्यांची गाडी अडविण्यात आली. फिर्यादीस खोऱ्याचे दांडके, स्टम्पने मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, घड्याळ, अंगठी, ५० हजार रुपये आदी ऐवज चोरुन नेल्याची फिर्याद दाखल आहे..
दरम्यान स्वप्निल शशिकांत सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार सुहास शेळके, अविनाश ढोरमले, लकी कळमकर, संतोष तरटे, संजय तरटे यांच्याविरुद्ध १६ तोळे सोन्याचे दागिने नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमा करून फिर्यादीस लाथाबुक्यांनी मारहाण करून सदरचा ऐवज चोरुन नेला.