पाचपुते यांच्याविरोधात अविश्वास ठराव !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- पारनेरच्या नगरसेवकांचे पक्षांतरनाचे राजकीय नाट्य संपते न संपते तोच श्रीगोंदा कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती धनसिंग विठ्ठल भोइटे

यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या कार्यालयकडे सोपवल्याने राजकीय खळबळ उडवून दिली होती.

मागील साडेतीन वर्षांपासून नामधारी पद व सह्यांचे अधिकार नसल्याने हा राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले होते. उपसभापती वैभव पाचपुते यांच्याच विरोधात एकत्र येऊन त्यांच्या विरोधात देखील अविश्वास ठराव येण्याची तयारी सुरु केली होती.

त्यानुसार आता 18 पैकी 12 संचालकांनी उपसभापतींच्या विरोधात मनमानी आणि इतर संचालकांना विश्वासात घेत नसल्याचे कारण देत जिल्हाधिकार्‍यांकडे संचालक संजयराव जामदार यांच्या नेतृत्वाखाली अविश्वास ठराव दाखल केला.

24 ऑक्टोंबर 2016 रोजी श्रीगोंदा तालुका कृषिउत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली होती. या कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये जगताप,

नागवडे गटाचे 10 संचालक तर भाजपच्या आमदार बबनराव पाचपुते गटाचे आठ संचालक निवडून आले होते. आघाडीचे प्रवीणकुमार नाहाटा हे सभापती होते.

त्यांनी राजीनामा दिल्यावर धनसिंग भोइटे सभापती म्हणून तर उपसभापती म्हणून तर भाजपचे वैभव पाचपुते यांची निवड करण्यात आली.

नाहाटा यांची पंचायत समितीच्या निवडणुकीत हार झाल्याने व जामदार यांचे उपसभापतिपद गेल्याने अवघ्या पाचच महिन्यांत आघाडी धर्म सोडून वैभव पाचपुते यांच्याशी हातमिळवणी करत

सभापती धनसिंग भोइटे यांचे सह्यांसह सर्व अधिकार काढून घेत नाममात्र सभापती ठेवले. उपसभापती वैभव पाचपुते यांनी सगळा कारभार हातात घेतला.

आता बाजार समितीचे माजी उपसभापती आणि विद्यमान संचालक संजय जामदार यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 14 रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे उपसभापती वैभव पाचपुते यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे.

यावर 12 संचालकांच्या सह्या असून पाचपुते हे मनमानी पद्धतीने काम करत असून संचालकांना विश्वासात घेत नसल्याचे त्यात म्हटले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment