हार्दिक पटेल यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदाबाद : शनिवारी रात्री हार्दिक पटेल यांना  अहमदाबाद जिल्ह्याच्या विरमगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. देशद्रोहाच्या प्रकरणात पटेल यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला.

त्यांना 24 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अहमदाबादच्या एका न्यायालयाने हार्दिक पटेल यांच्याविरोधात शनिवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे .

सुनावणी दरम्यान हार्दिक पटेल सातत्याने अनुपस्थित राहिल्यामुळे  अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. पाटीदार आरक्षण समर्थनार्थ 25 ऑगस्ट 2015 रोजी हार्दिक पटेल यांनी अहमदाबाद येथे एक रॅली काढली होती.

त्यानंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. त्यावेळी पोलिसांनी हिंसाचाराप्रकरणी हार्दिक आणि सहकाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment