अहमदनगर :- नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे, ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्यासह एकूण १२ उमेदवारांच्या खर्च तपासणीत त्रुटी आढळल्या.
त्यामुळे त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्यानंतर ४८ तासांत खुलासा सादर करण्याचे आदेश आहेत.

१ ते १० एप्रिल या कालावधीत उमेदवारांनी केलेल्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी शनिवारी झाली. प्रत्येक उमेदवाराला ७० लाख रुपयांची खर्चाची मर्यादा आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या दिवसापासून दैनंदिन निवडणूक खर्च यात समाविष्ट आहे. तपासणीत एकूण १२ उमेदवारांच्या हिशेबात त्रुटी आढळल्या.
झेरॉक्सचे बिल न जोडणे, देणगी मिळालेले पैसे बँकेत जमा न करता परस्पर खर्च करणे, नोटरीच्या पावत्या न जोडणे, देणगी देणाऱ्यांच्या नावांची यादी नसणे,
देणगी पावत्यांच्या प्रती तपासणीसाठी सादर न करणे, अनामत रक्कम पावती न जोडणे, घोषित केलेला खर्च व निवडणूक आयोगाच्या संगणीत केलेला खर्च यामध्ये तफावत असणे या त्रुटी निदर्शनास आल्या.
विखे, जगताप यांच्यासह सुधाकर लक्ष्मण आव्हाड, रामनाथ गहिनीनाथ गोल्हार, कलीराम बहिरू पोपळघट, संजय सावंत, संदीप लक्ष्मण सकट, साईनाथ बाबासाहेब घोरपडे,
नामदेव अर्जुन वाकळे, श्रीधर जाखुजी दरेकर, शेख अबिद अहमद हनिफ, भास्कर फकिरा पाटोळे, दत्तात्रय अप्पा वाघमोडे यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
- 20 हजार पेक्षाही कमी किंमतीत मिळतील हे 3 वॉटरप्रूफ 5G स्मार्टफोन्स
- फक्त 4 लाखात घरी आणा AMT व्हेरियंट Renault Kwid ची जबरदस्त ऑफर
- फक्त 8 एप्रिलपर्यंत ! Brezza वर सध्या मिळतोय भलामोठा डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर
- घरबसल्या घ्या सिनेमॅटिक मज्जा, शाओमीचा 4K व्हिज्युअलचा TV लवकरच भारतात
- खुशखबर ! टाटा हॅरियरवर मिळतेय बंपर सूट, अशी संधी पुन्हा येणार नाही