‘त्या’आजी माजी नगरसेवकांना नोटिसा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर नगरपालिकेच्या भुयारी गटार प्रकरणात सुमारे १३ कोटी कोटी ९३ लाख ८४ हजार ९५४ रुपयांच्या अपहारप्रकरणी केतन खोरे यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीवरून अहमदनगर जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांनी चौकशीसाठी २० फेब्रुवारी रोजी उपस्थित राहण्याबाबत २९ आजी माजी नगरसेवकांना समजपत्र बजावले आहेत.

भुयारी गटारप्रकरणी तत्कालीन नगराध्यक्षा यांच्यासह दोन मुख्याधिकारी, दोन बांधकाम अभियंता व ठेकेदार यांच्यावर याचिकाकर्ते केतन खोरे यांनी २१ सप्टेंबर २०१९ रोजी रात्री श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

त्यावरून अहमदनगर जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांनी मुज्जफर शेख, अंजुम शेख, अण्णासाहेब डावखर, श्रीनिवास बिहाणी, राजन चुग, राजेश अलघ, मंगल तोरणे, कांचन सानप,

संगीता मंडलिक, कैलास व्यंकटरामन्, सुधा कांबळे, भारती कांबळे, आशिष धनवटे, निलोफर शेख, रजियाबी जहागीरदार, रवींद्र गुलाटी, राजश्री सोनवणे, सुमैया पठाण, श्याम अढांगळे, जायेदबी कुरेशी, सायरा शेख, रागेश्वरी मोरे, राजेंद्र महंकाळे, मंजुश्री मुरकुटे, निर्मला मुळे,

वनिता खोसरे, सुभाष गांगड, दत्तात्रय साबळे, कल्याण कुंकुलोळ या २९ आजी माजी नगरसेवकांना समज पत्र बजावण्यात आले असून २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यलयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment