अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- नगरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज पडत आहे.
हे ओळखून आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक पवन गांधी यांच्या प्रयत्नातून मुंबईच्या अथर्व ग्रीन एकोटेक कंपनी व मानवी व्हॅल्यूच्या आंतरराष्ट्रीय असोसिएशनच्या सहकार्याने नगरच्या जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमधील
कोरोना बाधितांच्या उपचारासाठी दहा अत्याधुनिक हायफ्लो ऑक्सिजन मशीन देण्यात आले. या मशिनमुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मुबलक ऑक्सिजन मिळणार आहे.
जिल्हा रुग्णालयात रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील पोखरणा यांच्याकडे पवन गांधी यांनी हे सर्व मशीन सुपूर्द केले. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे सदस्य अॅड.
अनंत फिरोदिया, गायक भूषण मालू, योगेश बजाज आदि उपस्थित होते. पवन गांधी म्हणाले, नगरमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अनेक कोरोना रुग्णांचा ऑक्सिजन कमी झाल्याने मृत्यू झाला आहे.
परिस्थिती नियंत्रणात रहावी यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या संकल्पनेतून जिल्हा रूग्णालयासाठी तातडीने अत्याधुनिक हायफ्लो ऑक्सिजन मशीनची मागणी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मानवी व्हॅल्यूच्या
आंतरराष्ट्रीय असोसिएशनकडे करण्यात आली. त्यानुसार अथर्व ग्रीन एकोटेक कंपनीच्या सहकार्याने जिल्हा रुग्णालयाला अल्पावधीत हे दहा अत्याधुनिक हायफ्लो ऑक्सिजन मशीन मोफत मिळाल्या आहेत.
यासाठी मुंबईचे रमेश रमण व उद्योजक चंद्रकांत राठी यांचे सहकार्य लाभले. हे अत्याधुनिक मशीन उपलब्ध झाल्याने या पुढील काळात कोरोना बाधितांचा ऑक्सिजन अभावी मूत्यू होणार नाही.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved