आता या तालुक्यात आढळून आला मानवी मृतदेह

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील आंबी फाटा येथे नाशिक-पुणे महामार्गालगत खंदरमाळवाडीच्या हद्दीत बुधवारी सकाळी रस्त्यावर एक मृतदेह आढळून आला आहे. यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील आंबीफाटा परिसरात खंदरमाळवाडीच्या हद्दीत एक अनोळखी ४५ ते ५० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी घारगाव पोलिस पथक हजर झाले. सदर मृतदेह हा अज्ञात व्यक्तीचा असून त्याच्या अंगात निळसर राखाडी रंगाची फूल पॅन्ट, शर्ट फिक्कट गुलाबी, प्लास्टिक काळी चप्पल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मृत व्यक्तीच्या डोक्याला व छातीला मार असून प्राथमिक अंदाजानुसार खुनाचा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत व्यक्तीचे ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

मृतदेह खाजगी रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रूग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशियतांना ताब्यात घेतले आहे. त्यांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment