सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :-माहेरहून ट्रॅक्टर घेण्यासाठी २ लाख रुपये आणावेत यासाठी केलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. दरम्यान हि धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे घडली आहे.

तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील सासर असलेल्या मंजुषा भालेराव (२३)हिचे गेल्या दोन वर्षांपूर्वी प्रवीण भालेराव यांच्याशी विवाह झाला होता.

घरात नवरा प्रवीण, सासरा राजेंद्र हा गावातच ट्रॅक्टर चालविण्याचे काम करत होते, स्वत:च्या मालकीचा एक ट्रॅक्टर देखील होता. मात्र आणखी एक नवीन ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये आणण्याचा नेहमीच तगादा कुटुंबातील सदस्य यांनी मंजुषा हिच्याकडे लावत होते.

त्यामुळे या त्रासाला कंटाळून मंजुषा हिने दि. २६ जानेवारी रोजी घरातील सिलिंग फॅन ला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात मयत मंजुषाचा भाऊ नवनाथ सुखदेव अंभग (वय३१ वर्षे) रा.पावबाकी (संगमनेर )यांनी फिर्याद दाखल केला असून नवरा प्रविण राजेंद्र भालेराव, सासरे राजेद्र आबाजी भालेराव ,

सासु- वैशाली राजेंद्र भालेराव, आजी सासु – कमलबाई आबाजी भालेराव, भाया राहुल राजेंद्र भालेराव,जाव प्रतिक्षा राहुल भालेराव सर्व रा. कोल्हार खुर्द ता. राहुरी यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.