अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : जिल्ह्यात जुलैअखेर एकूण ८ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. कोरोनाच्या संकटामुळे शासनाने ग्रामपंचायतींच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून त्याच्या कार्यवाहीस सुरुवात झाली आहे.
या ग्रामपंचायतीत चोभेवाडी, राजेवाडी, नान्नज, पोतेवाडी, गुरेवाडी (सर्व ता. जामखेड), आंबी, आंमळनेर (ता. राहुरी) व बहिरवाडी (ता. नेवासा) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
यांची मुदत ३१ जुलैअखेर संपत आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रशासक नियुक्त होणार आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews