‘त्या’ महिलेच्या संपर्कातील 56 जणांची तपासणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- शहरात एका ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून , या महिलेच्या संपकार्तील ५६ जणांची तपासणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात येणार आहे. तसेच सुभेदार गल्ली परिसर प्रशासनाच्यावतीने लॉक करण्यात आला आहे.

नगर शहरातील झेंडीगेट परिसरातील सुभेदारी गल्ली येथील महिलेला सर्दी, खोकला, ताप आदी त्रास झाला होता. म्हणून ही महिला स्वत : हून येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती

‘ सारी ‘ या आजाराची लक्षणे आढळून आल्याने या महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेऊन ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. महिलेचा अहवाल मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आला.

अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने महापालिकेने या महिलेला ताब्यात घेऊन सुरुवातीला बूथ हॉस्पिटलमध्ये नेले होते. परंतु या महिलेला जास्त त्रास होत असल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या महिलेची विचारपूस केली असता ही महिला एका डॉक्टरकडे उपचार घेत होती. या डॉक्टरसह या भागातील भागातील ५६ जण महिलेच्या संपर्कात आले आहेत.संपर्कातील लोकांना एका बसमधून जिल्हा रुग्णालयात आणले. तेथे या रुग्णांची तपासणी सुरू आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment