सरपंचासह ग्रामसेवकाविरूद्ध अपहाराचा गुन्हा.

Ahmednagarlive24
Published:

संगमनेर :- तालुक्याच्या पठार भागावरील सावरगाव घुले येथील सरपंच तान्हाजी मारुती घुले व ग्रामसेवक सुनील शंकर शेळके या दोघांनी संगनमताने शासकीय योजनांचे बनावट बिले, तसेच मजुरांचे खोटे अंगठे घेवून शासकीय रकमेचा अपहार केल्याची घटना सन २०१५ ते २०१७ या कालावधीमध्ये घडली आहे.

याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, सावरगाव घुले गावचे सरपंच तान्हाजी मारुती शेळके व ग्रामसेवक सुनील शंकर शेळके (रा. विजयनगर, कुरणरोड, संगमनेर) हे या दोघांनी संगनमताने सन २०१५ ते २०१७ या कालावधीत शासकीय योजनांचे बनावट बिले बनवली.

तसेच काम केलेबाबत मजुरांचे खोटे अंगठे घेवून शासकीय २५ हजार ५०० रूपये रकमेचा अपहार केला आहे. त्यामुळे विस्तार अधिकारी वाघमोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी सरपंच व ग्रामसेवक या दोघांविरुद्ध गु.र.नं. १२/२०१९ भादंवि कलम ४०९, ४६५, ४६६, ४६७, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment