माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्याशी लग्न करायचे, असे म्हणत त्याने जबरदस्तीने दुचाकीवर बसवून तिला नेली आणि…

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदे :- लग्नाचे आमिष दाखवून श्रीगोंदे फॅक्टरी परिसरातील अल्पवयीन मुलीला गणेश संतोष ढवळे (वय २२) याने जबरदस्तीने गाडीवर बसवून निर्जन स्थळी नेऊन विनयभंग केला. या प्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश हा मागील वर्षापासून नववीत शिकणाऱ्या या मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझ्याशी लग्न करायचे, असे म्हणत तो छेड काढत असे. घरच्यांना कळवल्यास जीव देईन, अशी धमकीही त्याने मुलीला दिली.

मुलीने गणेशला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने छेड काढणे थांबवले नाही. १० फेब्रुवारीला ही मुलगी शाळेत जाण्यासाठी निघाली असता गणेशने तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून घारगाव परिसरात नेत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे घाबरून पीडित मुलीने घरच्यांना झालेली घटना सांगितली. मुलीच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गणेशवर बालकांचे लैंगिक अधिनियम, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment